Kolhapur : कोल्हापूरमध्ये पुरात ट्रॅक्टर उलटला, 6 जण बुडाले, शेतात जाताना घडली घटना…
Kolhapur : अकिवाट (ता. शिरोळ) येथे पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टरमधून शेताकडे जात असताना ट्रॅक्टर उलटून सहाजण कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडाले. त्यातील चौघांना सुखरूप काढले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, अकिवाट-बस्तवाड रस्त्यावर अकिवाट हद्दीतील ओढ्यावर आज, ही घटना शुक्रवारी (ता.२) सकाळच्या सुमारास घडलीआहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रेस्क्यू फोर्स व एनडीआरएफचे जवान बेपत्ता असलेल्याचा शोध घेत आहेत.
Views:
[jp_post_view]