मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे बदल! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदेमंत्री पदावरुन हटवलं…


नवी दिल्ली : सध्या दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात काही बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू  यांना पदावरुन हटवण्यात आल्याची बातमी आहे.

गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रिजिजू यांच्या जागी आता अर्जुनराम मेघवाल ही जबाबदारी सांभाळणार आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 मे रोजी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती केली आहे. किरेन रिजिजू यांना भू-विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

तसेच कायदेमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओ व्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!