खडकवासला नवीन मुठा कालव्याची वहनक्षमता वाढली ! ३५ कोटी खर्चाने चालू उन्हाळी आवर्तनात दिसले परिणाम …!


पुणे : खडकवासला ते इंदापूरपर्यंत नवीन मुठा उजवा दुरुस्तीसाठी ३७ कोटी मंजूर निधीपैंकी ३५ कोटी रुपये खर्चाची कामे खडकवासला जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे. या कामामुळे कालव्याची वहनक्षमता वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

खडकवासला ते इंदापूरपर्यंत या २०२ किलोमीटर अंतरापर्यंत कालव्याची वहन क्षमता वाढावी म्हणून जलसंपदा विभागाकडुन ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कालवा गळती ठिकाणी अस्तरीकरण करणे, झाडेझुडपे काढणे, मजबुतीकरण करणे इ. कामे करण्यात आली आहे.

या कालव्याच्या शहरी भागात अजूनही ४० टक्के पाणीगळती होत होती. तर इंदापूर तालुक्यातील टेल पर्यंत कालव्याची वहनक्षमता कमी होती. जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नाने कालव्याची वहन क्षमता वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!