Ketaki Chitale : पोलीस महाणालायक असतात…; पुणे अपघात प्रकरणावर केतकी संतापली, व्हिडिओ केला शेअर

Ketaki Chitale : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या संपूर्ण देशात गाजत आहे. या अपघातात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येताना दिसत आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत.

या अपघातामुळे देशभरात खळबळ उडाली. अनेक जण या अपघाताबाबत भाष्य करत आहेत. अशातच आता अभिनेत्री केतकी चितळेने नं या घटनेबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. तिच्या या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. Ketaki Chital

काय म्हणाली केतकी?
केतकी चितळे हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे.
तसेच केतकीने तिच्या लेट्स टॉक युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते, त्यांनाच पोलिसांनी अरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाहीये.माझ्यावर तर डायरेक्ट डेथ थ्रेट देण्यात येत होते.
तेव्हा कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये मी गेले होते, ही केतकी तुच कशी? असे प्रश्न मला पोलिसांनी तेव्हा विचारले होते, अशी आठवण केतकी हिने सांगत पोलिसांवर टीका केली आहे. आता तिच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.