कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा उत्साह ; सकाळीच मतदान केंद्रात पोहचले वयोवृद्ध मतदार…!


पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून सुरु झाले आहे. चिंचवड मध्ये अश्विनी जगताप , अपक्ष राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी चे नाना कलाटे या तीन आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

याशिवाय कसबा पेठ येथेही भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मोठी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत. 2 मार्च रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

कसबा आणि चिंचवड अशा दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार, शिवसेना यूबीटीचे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांनी रोड शो, कॉर्नर सभा आणि जनतेच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला आहे.

दरम्यान आज सकाळी दोन्ही मतदारसंघासाठी उत्साहात मतदान सुरू झाले आहे. कसब्यात सकाळीच वयोवृद्ध मतदारांनी मतदानास बाहेर पडले. मतदारांत उत्साह असल्याचे जाणवते आहे. दोन्ही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असल्याने उच्चांकी मतदान होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील 135 आणि चिंचवड मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!