Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा संपन्न, सातवेळा मिळाला मान…

Kartiki Ekadashi 2023 पंढरपूर : मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.
बऱ्याच विरोधानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून चारवेळा आषाढीला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी मिळाली आहे.
आज पहाटे फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर, एकदा विरोध झाल्याने फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानीच मध्यरात्री महापूजा केली होती. शिवाय आता उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते सातव्यांदा महापूजा झाली आहे. Kartiki Ekadashi 2023
विशेष म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यंदाच्या कार्तिकी एकादशीला महापुजेसाठी आमंत्रण देतांना मंदिर समिती चांगलीच अडचणीत आली होती. कारण सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे कोणत्या उपमुख्यमंत्र्याला आमंत्रण द्यायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समोर आले. मात्र, यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना देखील कार्तिकीच्या महापुजेची संधी मिळालेली आहे