Kadamwakwasti : कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचा कुणबी जातप्रमाणपत्र अवैद्य! अहमदनगर जिल्हा जातपडताळणी समितीचा निर्णय..!!


Kadamwakwasti : उरुळी कांचन : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे गायकवाड यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हे आदेश दिले आहेत. Kadamwakwasti

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून सरपंचपदासाठी उभे राहिले होते. मात्र, कल्पना बाबासाहेब काळभोर, प्रीतम भास्कर काळभोर व ऋषिकेश विद्याधर काळभोर यांनी यावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

चित्तरंजन गायकवाड यांचा कुणबी (८३) (इतर मागास वर्ग) जातीदावा अमान्य करण्यात येत असून, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा पारनेर (जि. अहमदनगर) यांनी निर्गमित केलेले कुणबी या जातीचे प्रमाणपत्र ”अवैध” ठरविले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र जप्त करण्यात येणार आहे.

दरम्यान, स्थानिक चौकशीत गायकवाड यांचे मूळ गाव मौजे कदमवाकवस्ती असून, ते जातीने मराठा आहेत. तर शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्याचे स्पष्ट झाले. अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या पडताळणीत चित्तरंजन गायकवाड यांचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले आहे.

त्यामुळे गायकवाड यांचे सरपंचपद रद्द झाले आहे. सरपंच चित्तरंजन गायकवाड यांना समितीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायायालयात दाद मागता येणार आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!