Justice Abhijeet Gagopadhyay : राजकारणात मोठ्या घडामोडी! सकाळी हायकोर्टाच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा आणि दुपारी भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा..

Justice Abhijeet Gagopadhyay : लोकसभा निवडणुकीचा पारा आता चांगलाच चढायला लागला आहे. त्यामुळं अनेक राजकीय मंडळींचा पक्षांतराचा कार्यक्रमही सुरु होईल. पण यामध्ये एक अजबच पक्ष प्रवेश घडून येणार आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा देत न्यायमूर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
त्यानुसार, कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती ज्यांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दुपारी आपण आता भाजपत प्रवेश करणार आहोत असं जाहीरही केले. आपल्या भाजप प्रवेशाची तारीखही त्यांनी जाहीर केली आहे.

अभिजीत गंगोपाध्याय असे या न्यायमूर्तींचे नाव आहे. गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा दिला आहे. तसेच त्याची कॉपी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवज्ञानम यांना पाठवली आहे. Justice Abhijeet Gagopadhyay


दरम्यान, एक दिवस आधीच म्हणजे ४ मार्च २०२४ रोजी न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांनी म्हंटले होते की, आपण न्यायमूर्ती म्हणून आपले काम पूर्ण केलं आहे. काही वकिलांनी त्यांना न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला होता.