Jitendra Awhad : श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं, जितेंद्र आव्हाडांवर अखेर पुण्यात गुन्हा दाखल…

Jitendra Awhad पुणे : श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती
पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९५ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. भाजपने आव्हाड यांच्या विरोधात काल आंदोलन केले होते. Jitendra Awhad
दरम्यान, शिर्डी येथील राष्ट्रवादी चिंतन शिबिरात बोलताना ‘श्रीराम हे मांसाहारी होते’ असे वक्तव्य करून आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे सगळीकडून टीकेची झोड उठल्यानंतर आव्हाड यांनी आपल्या विधानावर माफीही मागितली होती.
पण यावर पुणे शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत निषेध मोर्चाही काढला होता. आता याप्रकणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावविश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.