तरडे येथे बंगला फोडून दागिने चोरी प्रकरण! अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३ गुन्ह्यांची पोलिसांकडून उकल..

लोणी काळभोर : बंगला फोडून तिजोरीमधील चालूबाजार भावाप्रमाणे सुमारे २८ लाखांच्या सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना तरडे (ता.हवेली) येथून समोर आली. रेल्वे कोलस वस्ती परिसरात घडली असून शनिवार (ता.१) फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
अशातच आता या घरफोडीतील मुख्य आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करून सुमारे साडे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय.४५ रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी, थेऊर कोलवडी रोड, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी स्टीफनविक्टर वलेरवण लासराडो (वय. ५१, रा. प्लॉट नं. ५२४, रेल्वे कोलस वस्ती रोड, तरडे ता हवेली जि- पुणे, मुळ रा बिल्डींग नं १५० फ्लॅट नं.4 डी.4 था मजला रोड नं 1 ब्लॉक नं 3. अलअमादी गर्व्हर्नरेट, देश कवेत) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी स्टीफनविक्टर लासराडो यांचा तरडे परिसरात बंगला आहे. फिर्यादी हे बुधवारी (ता.29) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. ते शनिवारी (ता.१) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा फिर्यादी यांना घराचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. आणि घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
त्यानंतर फिर्यादी यांनी त्वरित घरात जाऊन पाहणी केली असता, मास्टर बेडरुममधील बेडच्या फरशीचे खाली खड्डा खादुन तयार करण्यात आलेल्या तिजोरीमधील स्टिलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने आढळून आले नाही. दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरातील सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने व 4 किलो 200 ग्रॅम चांदीची बिस्किटे, असा एकूण चालू बाजारभावाप्रमाणे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या सोन्याच्या दागिन्यांमध्ये हार, अंगठी, नेकलेस, चैन व बांगडी या दागिन्यांचा समावेश आहे. घरात चोरी झाल्याचे लक्षात झाल्यानंतर फिर्यादी स्टीफनविक्टर लासराडो ठाणे गाठले. आणि अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 331 (1),331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या पथकाला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा शुक्रवारी (ता.७ फेब्रुवारी) तपास करीत असताना, पथकाला तरडे येथील घरफोडी ही संगतसिंग कल्याणी याने केली असून तो थेऊर येथील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयाशेजारी उभा आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून संगतसिंग कल्याणी याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. आरोपी संगतसिंग कल्याणी याला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी घरफोडीच्या व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजून दोन अशा तीन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, आरोपीकडून तरडे येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील 9 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व एक किलो वजनाची चांदीची वीट असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.