JEE NEET Exam : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, जेईई, नीटच्या तारखा जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक…


JEE NEET Exam पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) पुढील वर्षी होणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन), राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसह (नीट) होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. JEE NEET Exam

त्यानुसार जेईई दोन टप्प्यात होणार असून, ऑनलाइन परीक्षांचे निकाल परीक्षेनंतर तीन आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे, असी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे. JEE NEET Exam

जेईई परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे, तर दुसरा टप्पा १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट परीक्षा ५ मे रोजी नियोजित आहे.

देशभरातील केंद्रीय, सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-यूजी) १५ ते ३१ मेदरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा सीयूईटी-पीजी ११ ते २८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षांबाबतची सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना प्रसिद्ध केली जाईल.

देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा यूजीसी नेट ही १० ते २१ जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा असल्याने, परीक्षेची अनेक उमेदवार वाट पाहतात. त्यामुळे एनटीएने वेळापत्रक प्रसिद्ध करून दिलासा दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!