दौंड येथे भिंतीचे बांधकाम ओले असतानाच जेसीबीचा धक्का लागला; भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन महिला कामगारांचा मृत्यू, एक गंभीर…


दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील मेलझर केमिकल प्रा. लि. कंपनीत बांधकाम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे.

ही घटना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जयकुमार रामचंद्र मुंडफणे आणि अक्षय भानुदास मोरे असे गुन्हा दाखल असल्यांची नावे आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, ममतादेवी सुदाम दास वय २७ वर्षे, सोनीदेवी सरयु कुमार वय २८ वर्षे, अशी मृत महिला कामगारांची नावे असून त्या दोघी ही सध्या दौंड तालुक्यातील मुकादमवाडी पांढरेवाडी येथे राहत होत्या. त्या मुळच्या मध्य प्रदेशातील आहेत. तर गितादेवी बाबुलाल कोल या महिला कामगार जखमी असून तिच्यावर पिरॅमिड हॉस्पिटल दौंड येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय धनीराम नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिंतीचे बांधकाम ओले असतानाच बाहेरील बाजूने जेसीबीने माती भरल्याने मातीचा भरावामुळे दबाव वाढल्याने भिंत आतील बाजूस कोसळली.

कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली वरील ३ महिला अडकल्या होत्या. तिथे उपस्थित असणारे नागरीकांच्या यांच्या मदतीने भिंतीच्या ढिगाऱ्याखालून महिलांना बाहेर काढून उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी दोन महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!