आरोपी खोटे म्हणून जयकुमार गोरे यांनी हक्कभंग आणला अन् तिकडे दुसरी महिला पुरावाच घेऊन आली, आता मंत्री गोरेंचाही राजीनामा होणार?


मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सध्या अडचणीत आले आहेत. हंबीरराव मोहिते यांच्या राजघराण्यातील महिलेला न्यूड फोटो पाठवण्याच्या प्रकरणात ते वादात आहेत. याबाबत आरोप करणारांबाबत त्यांनी हक्कभंग देखील आणला आहे. दुसरीकडे संबंधित महिलेने तर आरोप केले आहेतच, शिवाय आणखी एक महिला पुराव्यासह समोर येणार असल्याचे दिसते आहे.

त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढच होईल असे दिसत आहे. या प्रकरणात त्यांचा बचाव करताना ते कोर्टाने आपल्याला निर्दोष सोडल्याची सांगत आहेत. लयभारी या यूट्यूब चैनलसह सामनाचे संपादक व खासदार संजय राऊत व आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जयकुमार गोरे यांनी हक्कभंग मांडला आहे. असे असताना अजून एक महिला समोर आली आहे.

आता संबंधित महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत आणखी एक महिला जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाची शिकार झाल्याची सांगत ती देखील पुराव्यासह समोर येणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून वातावरण चांगलेच तापले आहे. महिलेने सांगितले की, जयकुमार गोरे हे निर्दोष सुटलेले नाहीत, तर माझी माफी मागितल्यामुळे मी प्रकरण मागे घेतले. मी उपकार केल्यानेच तो सुटला असे या महिलेने स्पष्ट केले आहे.

तसेच 2017 मध्ये त्याने माफी मागितली नव्हती, म्हणून मी खटला दाखल केला. मला धमकीचे फोन आले. सहा वर्ष मला त्रास दिला. मात्र त्यानंतर 2019 मध्ये निवडून आल्यानंतर केसचा त्रास होईल, म्हणून कोर्टामध्ये माझी पाया पडून माफी मागितली, म्हणून मी प्रकरण मागे घेतले होते, असे सांगितले आहे.

दरम्यान, स्वतःचा बचाव करताना जयकुमार गोरे यांनी न्यायालयाने यापुढील काळात हे फोटो व्हायरल करू नयेत असे आदेश दिले आहेत. तरीही हे फोटो वापरत आहेत. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे सांगितले आहे. सभागृहातील काही लोक माझ्या विरोधात हा प्रकार करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, महिलेने आता आता जर मी गप्प बसली, तर आणखी समस्येला मला सामोरे जावे लागेल म्हणूनच विधान भवनासमोर मी आंदोलन करणार आहे, असे सांगितले आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!