Jalgaon : राजकारणात खळबळ! जळगावमध्ये विधानसभा उमेदवाराच्या घरावर गोळीबार….


Jalgaon : जळगावातील मेहरूण परिसरात आज (ता.१८) पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

अज्ञाताने त्यांच्या घरावर बंदुकीच्या तीन फैरी झाल्या. अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती.

अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. गोळीबारामुळे काचा फुटल्या, त्याचा आवाज झाल्यानंतर अहमद हुसेन यांचे कुटुंब जागे झाले. तीन राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Jalgaon

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टींची माहिती घेवून तपास सुरु करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध कसून सुरु आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात याआधीही मुक्ताईनगर बोदवडमधून निवडणूक लढणारे उमेदवार विनोद सोनवणे यांच्या वाहनावरही गोळीबारची घटना घडली होती. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!