Jalgaon : अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या चक्क आळ्या!! जळगावातील धक्कादायक प्रकार…


Jalgaon : अंगणवाडीच्या पोषण आहारात आळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. जळगावमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरी विठ्ठल नगर भागात असणाऱ्या अंगणवाडीत ही घटना घडली असून यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

तर अंगणवाडी सेविकांना वारंवार सूचना दिल्या जातात. या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडे असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६१ मध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आळ्या आढळल्या. प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवाय, पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी (क्र.६१) चालवली जाते. या अंगणवाडीत 50 बालके व बालिका येतात. बालकांसाठी श्री सद्गुरू महिला बचत गटाकडून आहार पुरवण्यात येतो. सकाळी अंगणवाडीतील बालकांना डब्यात पोषण आहारातील खिचडी देण्यात आली.

कनिष्का बोरसे या मुलीच्या खिचडीत आळ्या आढळून आल्या आहेत. पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!