महाराष्ट्रासाठी मोठी बातमी ! छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार २०२४ पर्यंत महाराष्ट्रात येणार…!
मुंबई : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार लंडन येथील पुरातन म्युझियम मध्ये असून ही तलवार पुढच्या वर्षी २०२४ पर्यंत ही तलवार पुन्हा आपल्या ताब्यात असेल असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.
छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यानंतर स्वराज्य पुढे चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज, पेशवाई त्यानंतर अखंड हिंदुस्तानावरती इंग्रजांचे राज्य आले. आपल्या देशाला ” सोने की चिडिया ” समजले जाणाऱ्या देशात इंग्रजांनी सर्व संपत्तीची लूट केली, मंदिरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या मूर्ती देखील लुटून नेल्या. ब्रिटिशांनी आपल्या देशातील पुरातन असणारा सर्व खजाना समुद्रीय मार्गाने लुटून नेला, त्यामध्ये अनेक पुरातन वस्तू होत्या, स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर देखील, मोठी लूट करून रायगडा वर जाळपोळ केली .या लुटीमध्ये छत्रपती शिवरायांचे सिंहासन, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनामधील काही महत्त्वाच्या वस्तू लुटून नेण्यात आल्या होत्या.
छत्रपती शिवरायांना जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी पैजेचा विडा उचलणारा अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला होता. या अफजलखानाचा सर्व नाश करण्यासाठी आई जगदंबे ने साक्षात प्रसन्न होऊन जगदंबा तलवार शिवाजी महाराजांना दिली होती, ब्रिटिशांनी लुटलेल्या संपत्तीत या तलवारीचा समावेश आहे. ही तलवार आजही लंडन येथील म्युझियम मध्ये असून ही तलवार परत आणण्यासाठी राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील असून २०२४ पर्यंत जगदंबा तलवार आपल्या देशात असेल असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.