मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? कसं शोधणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर..

पुणे : राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गुरुवारी १५ जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येतात.

निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. काही वेळा अचानक बऱ्याच जणांची नावं मतदार यादीतून गायब होतात आणि हे बघून त्या मतदारांचा हिरमोड होतो. तर काही मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात जातात, त्यामुळे आताच आपण आपलं नाव मतदार यादीत आहे का? हे घरबसल्या सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात..
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?
1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या या लिंकवर क्लिक करा – https://electoralsearch.eci.gov.in/

2. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. ‘Search by Details’, ‘Search by EPIC’,
‘Search by State’ आणि Captcha Code येतो हे पर्याय भरून घ्या आणि सर्चवरती क्लिक करा.
3. आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.
4. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
5. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
दरम्यान, एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा. त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा. हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा. याचं उत्तर तुम्हाला एसएमएसमध्ये मिळेल. तसेच एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवलं जाईल. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास, ‘नो रेकॉर्ड फाऊंड’ असा मेसेज येईल.