देशात मोठा हाहाकार माजणार? सरकारच अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलं, आज डॉ. मनमोहन सिंग असते तर…! रोहित पवारांचे पोस्ट चर्चेत


पुणे : गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून महागाई वाढत चालली आहे. यावर आता विरोधक जोरदार टीका करत आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत टीका केली आहे.

शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले, आज पंडीत नेहरु किंवा स्व. इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी वाजपेयी किंवा डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखं जागतिक प्रश्नात हस्तक्षेप करु शकणारं उत्तुंग नेतृत्त्व नसण्याचा जबर फटका देशाला सहन करावा लागतोय.

आज पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे अडीच रुपये वाढ झाली असून रोजच होणारी ही दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण आहे. या दरवाढीमुळं देश ठप्प होत असताना सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसलंय.

यावर उपाययोजना करण्यास सरकार पूर्णतः असमर्थ ठरत असल्याने हा देश वाचावा यासाठी आपण एकतर केवळ प्रार्थना करु शकतो किंवा व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारु शकतो. चॉईस जनतेचा आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, गेल्या दहा दिवसांत 4 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे महागाई वाढत चालली आहे. येणाऱ्या काळात अजून अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे विरोधक सांगत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!