मोठी बातमी! इंदुरीकरांच्या अडचणी वाढल्या, होणार गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज अनेकदा अडचणीत येत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या लिंगभेदाबाबतच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी देखील ते बेताल वक्त्यावरून चर्चेत आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल केली होती.
त्यांनी सम तारखेला आणि विषम तारखेला संबंध आला तर मुला मुलगा किंवा मुलीचा कशाप्रकारे जन्म होतो?
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य शासनाच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली.

याप्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जेएफएमसी कोर्टात हे प्रकरण चालू होते.

पुढे हे प्रकरण सेशन कोर्टात गेले आणि सेशन कोर्टात हे प्रकरण हा गुन्हा रद्द करण्यात आला. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.