भारत गुगल -पे वापरणारा युजर्सचा सर्वाधिक मोठा देश! मात्र ही मोठी महासत्ता असलेला देश करणार गुगल-पे व्यवहार बंद..!!


Google pay aap sutting down : अनेक लोकांना २० रुपय द्यायचे असतील तर ते Google Pay वापरतात. भारतात डिजीटल पेमेंट करण्यांऱ्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. जगातील सर्वात जास्त डिजीटल पेमेंट हे भारतात केले जात आहेत. त्यामुळेच गुगल पे आणि इतर डिजीटल कंपन्यांचे महत्त्व वाढले आहे. पण असं असतानाच एका देशात मात्र गुगल पे बंद होणार आहे. कोणता आहे तो देश आणि का होतंय त्या देशात गुगल पे बंद?

Google ने घोषणा केली आहे की ते ४ जून २०२४ पासून अमेरिकेमध्ये Google Pay ॲप बंद करत आहे. अमेरिकेत ही सेवा बंद केली जाईल, मात्र भारत आणि सिंगापूरमध्ये ही सेवा सुरू राहतील.

अमेरिकेमध्ये ॲप बंद होणार असल्यामुळे गुगलने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद केले आहे. ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत गुगल पे ॲप बंद झाल्यानंतर अमेरिकन यूजर्स यापुढे ॲपद्वारे इतर लोकांना पैसे पाठवू शकणार नाहीत.

Android होमस्क्रीनवर दिसणारे ‘GPay’ ॲप ही जुनी आवृत्ती आहे. जी पेमेंट आणि फायनान्ससाठी वापरली जाते. मात्र, भारतातील लोकांना याची काळजी करण्याची गरज नाही कारण कंपनीने हा निर्णय अमेरिकेसाठी घेतला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील Google Pay वापरकर्त्यांना कंपनीने Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला दिला आहे. गुगलचे म्हणणे आहे की ते आपल्या वापरकर्त्यांना वेळोवेळी अपडेट्स देत राहील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!