Indapur : रात्रीच्या अंधारात बसले होते, गप्पा मारल्यानंतर झाली वादावादी, एका शब्दामुळे आला राग अन् मित्राला संपवलं, इंदापूर येथील धक्कादायक घटना…

Indapur : दिवसागणिक राज्यातील गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शुल्लक कारणांसाठी अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात वेगात वाढले आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शिवीगाळ केल्याचा मनात राग ठेवून एकाने आपल्या मित्राचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना मदनवाडी (ता. इंदापूर) येथील वन विभागाच्या जागेमध्ये सोमवारी रात्री उशिरा घडली. यामुळे भिगवण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. Indapur
विजयकुमार विठ्ठलराव काजळे ( वय ४५ वर्ष मूळ रा. निरगुडे ता.इंदापूर, हल्ली रा. मदनवाडी ता. इंदापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. सदरची घटना माध्यमिक विद्यालया समोरील रस्त्यावरच घडल्यामुळे येथील परिसर भीतीच्या छायेखाली आहे. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी राज भगवान शिंदे (बंडगरवस्ती, मदनवाडी ता.इंदापूर) या आरोपीला अवघ्या चार तासांत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय काजळे व राज शिंदे हे मित्र होते त्यांनी सोमवारी रात्रीच्या वेळी गप्पा मारल्यानंतर काही कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली शिवीगाळ केल्याचा राग आल्याने आरोपी शिंदे याने काजळे याचा दगडाने ठेचून खून केल्याची पोलिसांना कबूली दिली आहे.