Indapur News : इंदापुरात खळबळ! राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषद अभियंता रविराज राऊत व ठेकेदारासह सहा जणांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?


Indapur News  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषद अभियंता रविराज राऊत,व ठेकेदारासह सहा जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकणी लखन अंकुश काळे (वय ३४ वर्षे रा. शाहुनगर, इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरपरिषदेचे इंजिनिअर रविराज राऊत (रा. इंदापूर ता. इंदापूर), सौरभ शिंदे (रा.इंदापूर), अक्षय शिंदे (रा.हिंगणगाव ता. इंदापूर), नारायण राठोड, दादासाहेब भोंग, व बाळासाहेब ढवळे (रा.सरस्वतीनगर ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ढवळे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नगरपरिषदेच्या माध्यमातून शाहूनगर भागात फिर्यादी लखन काळे यांनी २५ एप्रिल, २६ मे आणि २६ जून असे तीन वेळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार केल्याचे म्हटले आहे. Indapur News

परंतु तक्रारीची दखल न घेता उलट दाखल गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे कृत्य केले. आत्मदहन केल्यानंतर तरी नगरपरिषद प्रशासन आपल्या तक्रारींची दखल घेईल या हेतूने फिर्यादी यांनी १७ ऑगस्ट रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ही सर्व बाब फिर्यादीने आपल्या फिर्यादीत नमूद केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होवून तीन दिवस उलटून गेले, इंदापूर पोलिसांनी आरोपींवर इंदापूर पोलीसांनी काय कारवाई केली हे समजू शकले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!