Indapur Crime : भयंकर! दारूची नशा अन् महिलेसह दोन लहान मुलांवर सत्तूरने वार, इंदापूरच्या भांडगावमध्ये थरारक घटना…

Indapur Crime : एका दारूड्याने दारूच्या नशेत तीस वर्षीय महिला व दोन लहान मुलांवर अत्यंत निर्घृणपणे सत्तूरने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे घडली आहे.
या थरारक घटनेने इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच याप्रकणी दारूड्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. Indapur Crime
सुरेश उमाजी मदने उर्फ गोट्या असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांची ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, तीन वर्षाची प्रियल लक्ष्मण चव्हाण, तीस वर्षीय सोनाली शाम जाधव व दीड वर्षाचा शिवांश शाम जाधव हे तिघेजण या घटनेत जखमी झाले असून घटना कशामुळे घडली, याचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
Views:
[jp_post_view]