Indapur : इंदापूरमध्ये धक्कादायक प्रकार!! ८० वर्षाच्या वृद्धाचा २६ वर्षीय मुलीवर बलात्कार, घटनेने उडाली खळबळ…

Indapur : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात एका ८० वर्षे वयाच्या वृद्धाने २६ वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुणे जिल्हा हादरला आहे.
याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यात घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की , एका २६ वर्षीय मतिमंद मुलीवर ८० वर्षे वयाच्या वृद्धाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला अटक केली आहे.
या मुलीच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, संबंधित कुटुंब भीतीच्या छायेत असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली करीत आहेत. Indapur
परिसरामध्ये संतापाची लाट…
दरम्यान, ही घटना समोर येताच परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.