IND vs BAN : पुणेकरांनो मॅच बघायला जाताय? वाहतुकीत आहे मोठा बदल, जाणून घ्या नाहीतर हैराण व्हाल..


IND vs BAN पुणे : भारतात क्रिकेट विश्वचषकाला दमदार सुरुवात झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. IND vs BAN

या विश्वचषकातील पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडिअम वर खेळण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. आज एमसीए स्टेडिअमवर विश्वचषक २०२३ मधील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. IND vs BAN

तब्बल २७ वर्षांनंतर क्रिकेट सामने पुण्यात होणार असल्यानं क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे. या मात्र गहुंजेला जाण्यासाठी रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

वाहतुकीत करण्यात आलेले बदल जाणून घ्या..

देहू रोड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. आज हजारो लोक सामना पाहण्यासाठी गहुंजे स्टेडियम गाठणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचे माहिती आहे.

मामुर्डी अंडर (मासुलकर फार्म) येथून कृष्णा चौकात जाण्यास मनाई आहे. पर्यायी मार्ग – लोढा येथून येणाऱ्या वाहनांनी मामुर्डी अंडरपास येथे उजवे वळण घेऊन बापदेव बुवा मार्गे कृष्णा चौकाकडे जावे.

वाहने साईनगर रोड ते सेंट्रल चौक मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग दोन- या मार्गावरील वाहने शितळा देवी-मामुर्डी जकात नाका मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतील.
अत्यावश्यक सेवा वाहने वगळून कार पासधारक वाहने आणि सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गहुंजे ब्रिज Y जंक्शन मार्गे स्टेडियममध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे.

मुंबईहून येणाऱ्या आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या गाड्यांना देहू रोडने एक्स्प्रेस वेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडने जाण्यास बंदी आहे.
मामुर्डी गावापासून मामुर्डी अंडरपास (मासुलकर फार्म) बाजूने प्रवेश बंदी आहे. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहनांनी मामुर्डी जकात नाक्यामार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जावे.

सामना संपल्यानंतर मामुर्डी अंडरपास बाजूने मामुर्डी अंडरपासकडे जाण्यासाठी प्रवेश साईनगर परिसरातील पार्किंग क्र. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 मधील वाहनांसाठी बंद राहील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!