पुण्यात आयकर विभागाचे छापे, कारवाईने उडाली खळबळ

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.

यामुळे यामध्ये काय हाती लागणार हे लवकरच समजेल. आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहेत आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. यामध्ये अनेकांचा समावेश आहे.
पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम
व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे.

या कारवाईत बांधकाम व्यावसायिकांना रडारवर होते. पुणे येथील अधिकाऱ्यांचे पथक ही कारवाई करत आहे. पुण्यातील ३ प्रसिद्ध बिल्डर यांच्या कार्यालय आणि घरांवर आयकर विभागाचे छापे पडले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:
[jp_post_view]