पुण्यात रक्षकच निघाला भक्षक ; पोलीस उपनिरीक्षकाचा 23 महिन्यापासून तरुणीवर अत्याचार, पोलिसांवर गुन्हा दाखल..


पुणे : विद्येच माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षकांन तरुणीवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पीएसआयने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केला, असा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अत्याचारासह मारहाण आणि धमकी देण्याच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे..

समोर आलेल्या माहितीनुसार, अजिंक्य रायसिंग जाधव (वय 32)असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे..
त्यांची तक्रारदार तरुणीसोबत २०२३ मध्ये समाज माध्यमांवर ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. उपनिरीक्षक जाधव याने तरुणीला लग्न करण्याचे खोटं आमिष दाखवलं. या आमिषाचा फायदा घेऊन त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे. ते पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी असून पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत.पीएसआय जाधव यांच्यावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या गंभीर प्रकारानंतर तरुणीने धीर करून फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि उपनिरीक्षक जाधवविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव याच्याविरुद्ध फसवणूक, बलात्कार, मारहाण आणि धमकी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!