आंध्रप्रदेशात तेल कंपनीत ७ मजुरांचा टँकरमध्ये गुदमरून मृत्यू…!


चित्तूर :आंध्र प्रदेशातील चित्तूर मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्तूर जिल्ह्यातील तेल कंपनीत काम करणाऱ्या सात मजुरांचा एका टँकर मध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे तर या घटनेतील एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना पेद्दापुरम मंडलातील रागमपेटा गावात गुरूवारी तेल कारखान्यात टँँकरची साफसफाई सुरू असताना ही दुर्घटना घडली. तेल कंपन्यांत टँंकर साफ करत असताना ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान सकाळी ९.३० च्या सुमारास मजूरांना थांबलेल्या टँँकरची सफाई करण्यात सांगितली. रेडप्पा यांनी मॅनहोलमधून प्रथम टँकरमध्ये प्रवेश केला. काही वेळ त्याने प्रतिसाद न दिल्याने अन्य तीन मजूर टँकरमध्ये गेले. जेव्हा त्यांना देखील श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली.

त्यानंतर अन्य तीन मजूर त्यांना वाचविण्यासाठी टँकरमध्ये चढले. मात्र, विषारी वायूमुळे ते सर्व बेशुद्ध पडले. यानंतर शिवकुमार रेड्डी खाली उतरले. त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला, म्हणून ते ओरडू लागले. यानंतर सर्व मजुरांना बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ६ जणांना मृत घोषित केले. उपचारादरम्यान ७ व्या मजुराचा मृत्यू झाला. शिवकुमार रेड्डी(४३) यांची तामिळनाडूतील वेलुरू येथे बदली करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!