शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मोफत वीजेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची महत्वाचं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…

पुणे : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तसेच, सामान्य नागरिकांच्या वीज दरात कपात करण्याचे आणि सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचे नियोजनही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळावी ही जुनी मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकरी वर्गाला वर्षातील ३६५ दिवस, दररोज १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. यासाठीची कार्यवाही सरकारने सुरू केली आहे.
इतकेच नव्हे तर, २०२५ ते २०३० या कालावधीत राज्यातील सामान्य वीज ग्राहकांचे वीज बिल दरवर्षी कमी करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या दिशेने नियोजन आणि कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच, ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून मोफत वीज पुरवठा करण्याची योजनाही त्यांनी आर्वी येथील एका कार्यक्रमात बोलताना माहिती दिली आहे.