उन्हाळ्यात त्वचा कोरडी होत असल्यास करा ‘हे’ सर्वोत्तम घरगुती उपाय, होईल मोठा फायदा..

पुणे : उन्हाळ्यातील कडक ऊन, प्रदूषण आण घामामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. यामुळे त्वचेवर चिकटपणा वाढला जातो. तेलकट त्वचा असणाऱ्यांना सीबम आणि चिकटपणामुळे पिंपल्स आणि अॅक्नेसारख्या समस्या उद्भवतात.
परंतु या दिवसांमध्ये तेलकट त्वचासह कोरडी त्वचा असलेल्या लोकांनाही या ऋतूत अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरात ओलावा कमी असणे, जास्त घाम येणे आणि वारंवार चेहरा धुणे यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघुन जातो. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते.
जर तुमची त्वचा उन्हाळ्यात कोरडी आणि निर्जीव होत असेल, तर तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांवर जास्त खर्च करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमची त्वचा हायड्रेटेड, मऊ आणि चमकदार बनवू शकता.
उन्हाळ्यात कोरडी त्वचा टाळण्यासाठी घरगुती उपाय पुढील प्रमाणे..
कोरफडीच्या जेलपासून आराम मिळवा
कोरफड हे एक नैसर्गिक हायड्रेटर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. ते त्वचेला थंड करते आणि उन्हाळ्यातील उन्हामुळे होणारी सनबर्न आणि कोरडेपणा दूर करते. तुम्ही कोरफड जेल घ्या आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ते 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. दररोज असे केल्याने त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहील.
नारळाच्या तेलाने मालिश करा
नारळाच्या तेलात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला खोलवर हायड्रेट करतात. आंघोळीपूर्वी नारळाचे तेल थोडे गरम करून चेहऱ्यावर आणि शरीरावर लावल्याने त्वचा मऊ राहते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर नारळाचे तेल लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. दुसऱ्या दिवशी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे.
दही आणि बेसनाचा फेस पॅक
दही त्वचेला हायड्रेट करण्यासोबतच मऊ आणि चमकदार बनवते. त्याचवेळी बेसन त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचेला फ्रेश ठेवते. २ चमचे दह्यात १ चमचा बेसन मिसळून तुम्ही फेस पॅक बनवा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी हलक्या हाताने स्क्रब करा आणि धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय करा.