मी मरेन, तुलाही गुंतवेन… पंकजा मुंडेंच्या पीएने दिली होती पत्नीला मोठी धमकी, थेट हातावर…


मुंबई : भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईतील घरात काल (शनिवारी, ता२२) टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

काल सायंकाळी सात वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गाैरीच्या आई वडिलांना या लग्नात ५० ते ६० लाख खर्च केली. लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू झाली. गाैरीला आल्या नवऱ्याचे इतर महिलांसोबत संबंध असल्याची माहिती मिळाली. यादरम्यान दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. शेवटी गाैरीने त्याला माफ केले. मात्र, यानंतरही तो इतर महिलांसोबत चॅटिंग करत असल्याचे गाैरीच्या लक्षात आले आणि ती तणावात होती. काल दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. अनंतच्या अनैतिक संबंधांना गाैरी पार कंटाळली होती.

हेच नाही तर ज्यावेळी गाैरीला अनंत गर्जेचे अनैतिक संबंध समजली होती, त्यावेळी दोघांमध्ये प्रचंड भांडणे झाली. अनंत गर्जेने स्वत:च्या हातावर चाकूने सपासप वार केले आणि म्हटले की, मी तर मरेल पण तुलाही गुंतवेल… गाैरीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आमची मुलगी खूप जास्त मेहनती होती. ती एक चांगली डॉक्टर होती आणि स्वत:च्या पायावर उभी होती खूप जास्त मेहनत करून ती इथपर्यंत पोहोचली होती.

दरम्यान, गाैरी आत्महत्या करूच शकत नाही. मागील काही महिन्यापासून अनंत गाैरीचा मानसिक छळ करत होता. त्याच्या म्हणण्यानुसार, गाैरीने आत्महत्या केली… मग हा स्वत: कसा तिला घेऊन रूग्णालयात पोहोचला? गाैरीने आत्महत्या केली होती तर याने पोलिसांनी घरी बोलावणे अपेक्षित होते ना.. ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा नातेवाईक आरोप करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!