महिलेसोबतच पतीची हत्या! खटल्यात 12 जणांचा जन्मठेप, बारामती सत्र न्यायालयाचा निर्णय…


बारामती : दौंड येथील खून खटल्यामध्ये बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. बारामतीत जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून अधिक जणांना जन्मठेप सुनावण्याचा हा पहिलाच खटला आहे. यामुळे प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

या शिक्षेमध्ये यामध्ये चार सख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे. २०१८ रोजी ही घटना घडली होती. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी मीना नरवाल व त्यांचे पती विनोद नरवाल हे दोघे रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून गणपतीचे दर्शन घेवून येत असताना दौंड न्यायालयाजवळ पासलकर वस्ती येथे आरोपींनी त्यांना अडवले होते.

यानंतर विनोद यांना बेदम मारहाण केली. मीना नरवाल यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा एकून उषा वडमारे या तेथे आल्या त्यांनाही मारहाण झाली. विनोद नरवाल यांचा मृत्यू झाला होता. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यामध्ये संजीत जयप्रकाश टाक, सुजीत जयप्रकाश टाक, रवी जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू दिपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, बबलू हिरामण सरवान, सुरेश हिरालाल सरवान, मयुरी संजीत टाक, माधुरी संजीत टाक, शोभा किशोर वाल्मिकी व विकी नरेश वाल्मिकी, अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दौंडचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!