मोठी बातमी ! बारावीचा गणिताचा पेपर फुटला ! व्हाट्सएपवर व्हायरल…!

पुणे : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी माहिती समोर आली आहे.

परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता गणिताच्या पेपरचा नवा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आद्यप याबाबत शिक्षण मंडळाकडुन पेपर फुटल्याचा दुजोरा मिळालेला नाही.
Views:
[jp_post_view]