…आणि अचानक क्रेन कोसळली!! समृद्धी महामार्गावर कसा झाला अपघात? बचावलेल्या कामगाराने सांगितला थरार..


पुणे : ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतानाच मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मशिनच्या सांगाड्याखाली काही जण अडकल्याची शक्यता आहे.

तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली आणि त्यावेळी काय स्थिती होती यासंबधीची माहिती त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की, ‘मी पिलरजवळ काम करत होतो, तेव्हा क्रेन कोसळली, गर्डरही कोसळलं, त्याच्याखाली मजूर दबले गेले. या दुर्घटनेत माझ्या ओळखीचे आणि जवळचे चार जण होते.

काही समजण्याच्या आतच गर्डरसकट क्रेन देखील खाली कोसळली. त्या व्यक्तीने सांगितले की, मी आणि आणखी एक व्यक्ती बाहेर निघाली असंही त्याने पुढे सांगितले आहे.

दरम्यान, ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!