महिलांनी सुंदरतेसाठी ॲक्सेसरीज कशा वापराव्यात…!


उरुळीकांचन : योग्य ॲक्सेसरीज घातल्याने सौंदर्यात भरच पडते. पण वेधडकपणे कोणत्याही ॲक्सेसरीज कशावरही घातल्या तर नक्कीच त्या सौंदर्याला मारक ठरतात. म्हणूनच आपलं सौंदर्य खुलण्यासाठी ॲक्सेसरीजची निवड विचारपूर्वक करायला हवी.

तुमचं वय, उंची, कामाचं स्वरूप, व्यक्तिमत्त्व आणि आपल्याला जिथे जायचं आहे त्या ठिकाणचं वातावरण, वेळ, प्रसंग या सगळ्या गोष्टींचा विचार ॲक्सेसरीजची निवड करताना करायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व, स्वभाव ओळखा. जर तुमचं व्यक्तिमत्त्व भारदस्त असेल तर ठसठशीत ॲक्सेसरीज तुम्हाला छान दिसतील. तुम्ही जर कॉर्पोरेट लेव्हलवर काम करत असाल तर कॉटनचे कुर्ते, साड्या, त्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी, वुडन कडाज्, वारली पेटिंग किंवा खणाच्या फाईल्स वापराव्यात. ज्यांचा संपर्क लोकांशी येतो अशांनी फ्रेश, ब्राईट कलर्स वापरावेत. त्यावर ॲक्सेसरीजची निवड करताना मॅचिंग, कॉन्ट्रास्ट, मिक्स अँड मॅच ही कॉम्बिनेशन्स करता येतील. रात्रीच्या वेळेस असणाऱ्या फंक्शनसाठी कमीत कमी ॲक्सेसरीज वापरा. डायमंड किंवा पर्लच्या ॲक्सेसरीज अवश्य वापरा. सकाळच्या कार्यक्रमांना मात्र भरपूर,

हेव्ही वर्क असलेल्या ज्वेलरीला प्राधान्य द्या. त्यात कुंदन, सोनं हे पर्याय निवडा. चप्पल, बॅग याची निवड करताना ब्रँडेड वस्तू खरेदी करण्यावर भर द्यावा आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटतील अशा बॅग, चप्पलची निवड करावी. टन, सिल्क, मलमल या फॅब्रिकप्रमाणेच रंग, डिझाईन व वर्क या निकषांवर स्कार्फचे विविध प्रकार बाजारात आहेत. प्रसंगानुसार तुम्ही स्कार्फची निवड करू शकता. उन्हाळ्यासाठी फिक्या रंगाचे कॉटन स्कार्फ उत्तम. कॅज्युअल, डिझायनर, पार्टी वेअर असे घड्याळ्यात वैविध्य आहे. त्यामुळे प्रसंगानुरूप घड्याळाची निवड करा.

आता केस गळती रोखण्यासाठी काही टिप्स

तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त असाल, तर तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी पुढील उपाययोजनाचा अवलंब अवश्य करा. ‘ओशिया हर्बल’ चे संस्थापक दिलीप कुंडलिया यांनी केस गळती थांबवण्यासाठी काही घरगुती टिप्स दिल्या आहेत.

 

केसांची मसाज

रोजच्या रोज काही मिनिटांसाठी केसांना मसाज करा. यामुळे डोक्यातील रक्त प्रवाह नियंत्रित होण्यास मदत होते. डोक्यातील त्वचेला रक्त प्रवाह सुरळीत झाल्यास केसांची मुळे घट्ट होतात. केसांच्या मसाजसाठी खोबरेल तेलात दोन थेंब लिंबूचा रस टाका आणि एका तासानंतर शॅम्पूने केस चांगले धुवा.

 

घरगुती हेयर स्पा 

गरम पाण्यात ऑलिव्ह तेलाचे काही थेंब घाला आणि त्यात दोन मिनिटांसाठी टॉवेल भिजवून ठेवा. नंतर या टॉवेलने केसांना झाकून घ्या. हा एक प्रकारचा नैसर्गिक स्पा आहे.

 

नैसर्गिक रस 

तुम्ही तुमच्या डोक्यातील त्वचेला लसूण, कांदा आणि आलं यांचा रस लावू शकता. हे रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी केस धुवून टाका.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!