HMPV व्हायरसचा किडनीवरही होतो परिणाम?, महत्वाची माहिती आली समोर…


नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना महामारीतून सावरले असतानाच आता पुन्हा चीनमध्ये नव्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरलचा (HMPV) कहर झाला आणि आता तो भारतात येऊन पोहोचला आहे. वास्तविक, हा जुना व्हायरस आहे, जो आज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

चीनमध्ये या विषाणूची प्रकरणे वाढली आहेत, तर भारतातही ७ रुग्णांची अधिकृत पुष्टी झाली आहे. या विषाणूने ग्रस्त रुग्णांना सामान्यतः सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि श्वसनाचे विविध संक्रमण यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

हा विषाणू सहसा लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना प्रभावित करतो. मात्र या विषाणूचा आपल्या किडनीवरही काही परिणाम होतो का? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात.

जसे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की, आपल्या शरीरात अनेक अवयव असतात, त्यातील एक म्हणजे किडनी. हा आपल्या शरीराचा एक आवश्यक भाग आहे, ज्याचे काम रक्त शुद्ध करणे आहे. शरीरात २ किडनी असतात, ज्या शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्याचं कार्य करतात, मात्र, एखाद्या व्यक्तीची एक किडनी खराब झाली, तर केवळ एका किडनीच्या मदतीने तो निरोगी आयुष्य जगू शकतो.

मानवी मेटापन्यूमोव्हायरस म्हणजेच HMPV व्हायरस हा व्यक्तीच्या फुफ्फुसावर हल्ला करतो, परंतु या विषाणूमुळे किडनीच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो का? एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. बी. विजयकिरण यांनी यावर काही माहिती दिली आहे.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, HMPV विषाणूचा किडनीच्या समस्या वाढण्यात अजिबात भूमिका नाही, परंतु हा विषाणू फुफ्फुसांवर परिणाम करण्यासाठी सक्रिय आहे. HMPV विषाणूमुळे फुफ्फुस खराब होतात कारण या विषाणूची काही लक्षणे सारखीच असतात.

एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणं…

खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यात अडचण, वाहणारे किंवा भरलेले नाक, ताप.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group