पहिलवानांकडुन शिकावा पहिलवानांचा सन्मान ! महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्याकडून हिंद केसरी अभिजीत कटके , महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना प्रत्येकी एक लाख…!
उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यातील मल्लांनी कुस्ती क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणारे हिंद केसरी अभिजीत कटके तर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी यावर्षी पटकवल्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते स्वर्गीय पैलवान रामचंद्र विठ्ठल काळभोर यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख स्वरूपात देऊन लोणी काळभोर येथे सन्मानित करण्यात आला आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील एका कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मल्ल अभिजीत कटके यांनी हैद्राबाद येथे झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत देश पातळीवरील मानाची हिंद केसरीची मानाची गदा पटकवली ,तर पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राज्य पातळीवरील मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकुन मानाची महाराष्ट्र केसरीची गदा खेड तालुक्यातील मल्ल शिवराज राक्षे या दोन मल्लांचा सन्मान लोणी काळभोरचे मल्ल महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या वतीने स्वर्गीय पैलवान रामचंद्र विठ्ठल काळभोर यांच्या स्मरणार्थ स्मृती चिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपये रोख स्वरूपात सन्मानित केले.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कुस्ती क्षेत्रातील खेळाडूंना राहुल काळभोर प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. तसेच त्यांच्या तालमित अनेक मल्लांना कुस्तीचे धडे देत आहेत व देश व राज्य पातळीवरील मल्ल घडवित आहेत व अनेक मल्लांना दत्तक घेऊन त्यांचा संपुर्ण खर्च राहुल काळभोर करत असल्याने त्यांच्या कामाचे कौतुक अजित पवार यांनी यावेळी केली .