कौतुकास्पद! वाढदिवसाचा खर्च टाळून वाहतूक समस्येवर खर्च, उरुळी कांचन च्या भाजप पदाधिकाऱ्याची अशीही मदत…!


उरुळी कांचन : उरुळी कांचन मध्ये सध्या नागरीक वाहतुक कोंडीने हैराण झाले आहे.वाहतुकीला शिस्त नसल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. असे असताना आपणही समाजाचे काही देणे लागतो, या हेतूने भाजप पुणे जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत कांचन यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून उरुळी कांचन शहराची वाहतुक समस्या लक्षात घेता स्वखर्चाने ४ ब्रॅरेगेट्स , कपाट साहित्य पोलिस प्रशासनास दिले आहे.

श्रीकांत कांचन यांनी आपला खर्च टाळून पोलिस प्रशासनास हे साहित्य देऊ करून सहकार्य केले आहे.यामुळे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी लोणी काळभोरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण धारगुडे, भाजप नेते राहुल शेवाळे उपस्थित होते.

हे साहित्य वितरणास युवा नेते अजिंक्य कांचन, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अलंकार कांचन, पश्चिम महाराष्ट्र भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, श्रीकांत कांचन, भाजप उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन, खुशाल कुंजीर, आबासाहेब चव्हाण, ओमकार कांचन, पुजा सणस, प्रशांत बिरमल आदी उपस्थित होते.

दरम्यान श्रीकांत कांचन यांच्याकडून या प्रकारची अनेक समाजोपयोगी कामे केली जात आहेत. यामुळे लोकांना याचा फायदा होत आहे. सर्वांनी समाजासाठी अशीच मदत केली तर अनेक अडचणी दूर होणार आहेत अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!