पूर्व हवेलीत मुसळधार पावसाने जनजीवनअक्षरशःहा ठप्प! राष्ट्रीय महामार्ग बंद पडण्याची परिस्थिती उद्भवली; नैसर्गिक आपत्तीला मानवी कृत्यांची जोड….


जयदिप जाधव

उरुळीकांचन : पूर्व हवेलीत रविवारी (दि.१४) रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून विजेचा प्रवाह खंडित होणे, रस्ते पाण्याखाली जाणे, वाहने बंद पडणे ,गाव -वाडीवस्त्यांचा संपर्क तुटणे असे प्रकार घडले असून अनेक दशकांच्या कालखंडानंतर पावसाचे पाणी थेट पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिरल्याने कवडीपाट ते बोरी भडक (ता.दौंड ) येथील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक रात्री १ पासून ठप्प होण्याची किमया घडली असून अभूतपूर्व परिस्थितीने पूर्व हवेलीची कोंडी झाली आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या विश्रातीनंतर वरुनराजा थेट सर्वदूर प्रचंड बरसला आहे. गणरायाला निरोप दिल्यानंतर पाऊस हंगामात पडेल अशी अशी शक्यता मावळली असताना पावसाने पितृपंधवरड्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र कहरकरीत रविवारी मध्यरात्री पासून अक्षरशः झोडपले आहे. सर्वदूर असलेल्या या बेभरोवशी पावसाने अक्षरशः कहर बरसवला असून रविवारी मध्यरात्री पाऊस मुसळधार स्वरूपात कोसळल्याने नैसर्गिक रौद्र अवताराला मानवरुपी अतिक्रमांची झालर भेटल्याने पूर्व हवेलीत महापूराने मोठे संकट उद्भवले आहे.

रविवारी रात्रीपासून मुसळधार बरसलेल्या पावसाने थेट पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक रात्रीपासूनच ठप्प केली आहे. अनेक ठिकाणी महामार्गालगत तसेच नैसर्गिक ओढे नाले अतिक्रमनांनी ओढल्याने राष्ट्रीय महामार्गावर कवडी पाट ते उरुळीकांचन पर्यंत मार्ग पूराने ओढला आहे. त्यामुळे या भागाची वाहतुक रात्रीपासून ठप्प झाली आहे. महामार्गावर अनेक वाहने पावसाने अडकून पडली असून वाहतुकीचा खोळंबा उडाला आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाचे व व्यावसायिकांचे हाल झाले आहेत.

तर दुसरीकडे ओढे नाले तुडुंब होऊन वाहल्याने वाडी -वस्त्यांमध्ये संपर्क तुटला असून वाहतुक ठप्प झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर असल्याने विजेचा खोळंबा झाला असून विजेअभावी शहरी रहिवाश्यांना मोठे हाल सोसावे लागले आहे. अनेकांनी घरातच बसणे पसंत केले आहे. त्यामुळे नैसर्गिक व मानवी हस्तक्षेपांनी राष्ट्रीय महामार्ग बंद पडण्याची परिस्थिती उद्भवल्याने पूर्व हवेलीला वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे.

डोंगरफोडी, नैसर्गिक विद्वंस व अतिक्रमण कारणीभूत!

पूर्व हवेलीच्या या भागात पुणे -सोलापूर महामार्ग महापूराने थेट बंद होण्याचा प्रकार अनेक कालखंडानंतर घडला आहे. यापूर्वीही या भागात नैसर्गिक आपत्ती आल्या मात्र महामार्ग बंद होईल अशी परिस्थिती उद्भवली नव्हती.मात्र आता जिल्हा प्रशासनाच्या पूर्ण हा दुर्लक्षाने नैसर्गिक साधन संपत्तीची मोठी हाणी झाली आहे. या भागातील विपुल नैसर्गिक बोडकी झाली असून मुरुम तस्करांनी डोंगरमाथे फोडले, अनधिकृत प्लॉटींग व्यवसाय रोडविल्याने ओढे -नाले प्रवाह नष्ट झाले त्यामुळे पीएमआरडीए ची व्यवस्था असून अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत गेल्याने या घटनेने गंभीर संकटाची चाहूल मिळाली आहे.

अजित पवारांनी एक नजर टाकावीच!

पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर मतदारसंघात जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान हडपसर , खराडी व केशवनगर भागाची रस्त्याची व वाहतुक कोंडी परिस्थितीवर उपाय म्हणून पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.तशीच परिस्थिती अनधिकृत व्यवसाय व माती -मुरुम तस्करांच्या चुकीच्या वागण्याने उद्भवली असून नैसर्गिक प्रवाह संपविऱ्यांवर ‘पीएमआरडीए’ला मोकळी सूट द्यावी अशी मागणी महत्वाची ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!