दक्षिण भारतात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, इतर राज्यातही होतोय सक्रिय…

नवी दिल्ली : पुढील पाच दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तामिळनाडूत मंगळवारी आणि किनारी आंध्र प्रदेशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
यामुळे शेतीच्या कामांना वेग येईल.
मंगळवारी सकाळी चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या आसपासच्या भागातही पाऊस पडू शकतो.
तसेच राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे येत्या २४ तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व राजस्थानमध्ये २० जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या प्रगतीबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही ढग बरसण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारी मध्य प्रदेशात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ओडिशामध्ये २१, २३ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० आणि २१ जून रोजी दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता तो कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 26 जून नंतर तो सक्रिय होईल, असे सांगितले जात आहे.