देशात भयाण परिस्थिती! २२ हून अधिक राज्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार..


नवी दिल्ली : सध्या देशात सर्वत्र पावसामुळे हाहाकार उडाला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस २२ हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशातच केदारनाथ यात्रा सुरूच आहे.

राज्यात सध्या ५० रस्ते बंद असून सुमारे ४० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ४०० छोटे-मोठे कालवे वाहून गेले आहेत. हरिद्वारमध्ये, गंगा अजूनही २९३.४५ मीटरवर, धोक्याच्या चिन्हाच्या वर वाहत आहे.

तसेच कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. गंगा, यमुना, घग्गर, हिंडन यासह सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून अनेक भाग पुराच्या पाण्यात बुडाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!