जरा वेगळं बोलला अन् अडकला! पोलिसांना संशय आला आणि राष्ट्रगीत म्हणायला लावलं, नंतर धक्कादायक माहिती पुढे आली…


मुंबई : येथे अनेकBangladeshi citizen स्थलांतरित होऊन राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अशात अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरात एक माणूस आपली ओळख लपवून राहत होता.

अल्ताफ खान असे त्यांचे नाव होते.२४ वर्षांचा अल्ताफ खान मुळचा बांगलादेशातील होता पण भारतात तो अवैधरित्या राहत होता. एके दिवशी पोलिसांना त्याच्या वागण्यावरून संशय आला. त्याची भाषा पश्चिम बंगालमधील लोकांपेक्षा थोडी वेगळी होती.

जेव्हा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबवले तेव्हा तो घाबरला आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला पोलिसांना त्याच्यावर आणखी संशय आला आणि त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात नेलं. तिथे पोलिसांनी त्याला भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सांगितले. अल्ताफला राष्ट्रगीत गाता आलं नाही. अल्ताफने पोलिसांसमोर राडा घातला. मला उगाच पकडून आणलंय, असा आरोप तो पोलिसांवर करत राहिला.

दरम्यान, पोलिसांनी त्याला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले पण तो तेही दाखवू शकला नाही. शेवटी त्याने कबुली दिली की तो बांगलादेशी आहे आणि भारतात अवैधरित्या राहत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर परकीय नागरिक आदेश कलम १४, ३(१) आणि ६ अंतर्गत गुन्हा नोंदवल्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!