सावत्र भावाने काढला भाऊ, वहिनीचा काटा; खून करून पळून जाताना मृत्यू ; पुण्यासह जिल्ह्यात खळबळ


शिरूर: शिरूर तालुक्यातील आंबळे गावात सावत्र भावानेच भाऊ आणि वहिनीवर चाकूने वार केले. त्यात वहिनीचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला आहे. यात आणखी भर म्हणजे खून करून पळून जाताना गाडीला धडक बसून सावत्र भावाचाही जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रिंयाका सुनिल ब्रेंद्रे ( वय २७ ) यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. तर भाऊ सुनिल बेंद्रे ( वय ३० ) हे गंभीर जखमी झाले आहे. तर पळून जात असताना आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे याच्या गाडीला धडक बसली आणि अपघातात तो ठार झाला. या बाबत मुलांचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे (वय- ५९) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. थोरला मुलगा सुनिल बेंद्रे आणि त्याची पत्नी प्रियांका हे पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. १ मे रोजी ते लंडनला जॉबसाठी जाणार होते. तसेच दुसरा मुलगा अनिल हा पुणे येथे कंपनीत काम करत होता. मात्र त्याच्या वागण्यामुळे तीन कंपन्या त्याला बदलाव्या लागल्या. काही महिन्यांपूर्वी त्याचे कंपनीतील काम गेल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. तो पुण्यातून गावाला आला होता. कंपनीचं काम भाऊ सुनिल याच्यामुळे गेले, असा त्याचा समज झाला आणि मनात राग होता. गावाला येऊन तो सतत आई वडील यांच्याशी भांडणं करत होता. ही भांडणं मिटवण्यासाठी वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील आणि सून प्रियांका यांना गावाला आंबळे इथं बोलवलं होतं.

सोमवारी रात्री याबाबत दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्याला समजावूनही सांगितले. जेवण केल्यानंतर प्रियांका आणि सुनिल हे घराच्या स्लॅबवर झोपले होते. तर वडील पोर्चमध्ये आणि अनिल घरात झोपला होता. पहाटेच्या सुमारास अचानक आरडा ओरडा ऐकायला आल्यामुळे वडील बाळासाहेब हे वर पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस अनिल हा प्रियांका आणि सुनिल यांना मारत असल्याचे त्यांना दिसले. अनिलने चाकू व लोखंडी डंबेलने प्रियंका व सुनिल यांच्यावर वार करत निर्घृणपने खून केला. प्रियंकावर जोरात वार झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर सुनील याला पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी अनिल हा मोटार सायकलवर पळून जात होता. स्वतःची मोटर सायकल घेऊन पळून जात असताना न्हावरे – चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली. त्यात तोही गंभीर जखमी झाला होता. ससून येथे उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनिल याचीही तब्बेत गंभीर आहे. त्याच्या छातीवर चाकुचे वार तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. प्रियंका यांच्या छातीवर खोलवर चाकूने पाच वार करण्यात आले. बचाव करीत असताना उजव्या हातालाही चाकूच्या जखमा आहेत. पुढील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.

दरम्यान, सुनिल व प्रियांका हे दोघेही आयटी इंजिनिअर होते. त्यांचे लग्न दोन वर्षापूर्वी झाले होते. त्यांना लंडन येथे जॉब करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ते खूप आनंदात होते. १ मे रोजी ते जाणार होते. मात्र काळाने दुर्देवी घाला घातला अन् सुखी संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले, अशी भावना प्रियंकाचे भाऊ स्वप्नील सयाजी भोसलकर यांनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!