हवेलीचे दोन आमदार पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या मदतीला धावले; मोडकळीस आलेल्या इमारतीला सभापतींचा शब्द पाळला…


पुणे : राज्यात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या, हवेली तालुका पंचायत समितीचा कारभार हा गेली अनेक वर्षांपासून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील, जुन्या जिल्हा परिषद इमारतीतून हाकला जातो. या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील सभागृह व विविध विभाग हे दुरुस्तीस आल्याने पदाधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

मागील 15/20 दिवसांपूर्वी आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार भीमराव तापकीर यांनी तालुका स्थरीय पाणी टंचाई व पाणंद रस्त्यांची आढावा बैठक, येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली होती.

यावेळी येथील सभागृहातील माईक साऊंड सिस्टमसह इतर गोष्टींची दुरवस्था असल्याने आमदार कटके व तापकीर यांनी, हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. यावेळी काकडे यांनी, जिल्हा नियोजन समितीकडे इमारत दुरुस्तीसाठी, निधीची मागणी केली असल्याचे सांगितले.

यावेळी हवेलीचे आमदार यानात्याने आमदार ज्ञानेश्वर कटके व भिमराव तापकीर यांना ‘आमदार निधीतून’ काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सभापती काकडे यांनी केली होती. यास दोनही आमदार महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत, प्रत्येकी 10/10 लक्ष निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे हवेली पंचायत समितीची इमारत दुरुस्त होऊन, पदाधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना दिलासा मिळणार आहे.

सभापती युवराज काकडे यांनी दोनही आमदार महोदयांचे आभार मानले आहेत. लवकरच इमारत दुरुस्तीचे काम हाती घेणार असून, अद्यायावत कोनशिलेसह कामाचे भूमिपूजन, आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार भीमराव तापकीर यांच्या शुभहस्ते करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!