हवेली बाजार समितीसाठी ७२.२८ टक्के मतदान ; ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वाधिक मतदान …!


उरुळी कांचन: हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल १९ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत शुक्रवारी १८ जागांसाठी सुमारे ७२.२८ टक्क्यांइतके चुरशीने मतदान झाले आहे . सर्वाधिक ग्रामपंचायत मतदारसंघात ९३.६८ टक्के, सेवा संस्था गटात ८८.६३टक्के तर व्यापारी मतदारसंघात ६३ टक्के तर हमाल मतदारसंघात ८९.८३ टक्के मतदान झाले आहे.

 

बाजार समितीच्या १८ जागांसाठी अरण्येश्वर-तळजाई रोडवरील श्री संदिप माणिकराव सातव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल येथे सेवा संस्था गट व ग्रामपंचायत मतदारसंघासाठी मतदान झाले.तर व्यापारी-आडते मतदार संघातील मतदान हे शुक्रवार पेठ येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल झाले. तर हमाल-मापाडी मतदार संघाचे मतदान मार्केट यार्डातील हमाल भवन येथे 3 मतदान केंद्रावर झाले.

विकास सोसायटी मतदार संघात ११ जागांसाठी १ हजार ९१८ त्यापैकी १ हजार ७०० मतदान (८८.६३ टक्के) झाले. ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागांसाठी ७१३ मतदारांपैकी ६६८ मतदान (९३.६८ टक्के) मतदान झाले.

आडते-व्यापारी मतदार संघातील २ जागांसाठी १३ हजार १७४ पैकी ८ हजार ७०५ (६६ टक्के) इतके मतदान झाले. तर हमाल-मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी २००७ मतापैकी १ हजार ८०३ ( ८९.८३ टक्के) मतदान झाले आहे.

शनिवारी (दि.२९) सकाळी ८ वाजल्यापासून मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात मतमोजणी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!