पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की कमी झाल्या? पाहा आजचे नवीन दर


पुणे : सरकारी तेल कंपन्यांनी आज, 8 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याचा आढावा घेतल्यानंतर दररोज सकाळी इंधनाचे दर अपडेट केले जातात. आजही देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास स्थिर आहेत.

मुंबईत आज पेट्रोलचा दर 111.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर इतका आहे. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये, तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 113.51 रुपये, तर डिझेल 99.82 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी 107.76 रुपये, तर डिझेलसाठी 99.55 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत.

देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही इंधन दरात विशेष बदल झालेला नाही. बंगळुरूमध्ये पेट्रोल 111.68 रुपये आणि डिझेल 99.56 रुपये, तर हैदराबादमध्ये पेट्रोल 115.69 रुपये आणि डिझेल 103.82 रुपये प्रति लिटर आहे.

नोएडामध्ये पेट्रोल 101.96 रुपये आणि डिझेल 95.44 रुपये, लखनौमध्ये पेट्रोल 101.86 रुपये आणि डिझेल 95.36 रुपये, तर पाटण्यात पेट्रोल 113.37 रुपये आणि डिझेल 99.36 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

जयपूरमध्ये पेट्रोल 113.19 रुपये आणि डिझेल 98.25 रुपये, भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 108.97 रुपये आणि डिझेल 100.68 रुपये, गुरुग्राममध्ये पेट्रोल 102.97 रुपये आणि डिझेल 95.64 रुपये, तर चंदीगडमध्ये पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.47 रुपये प्रति लिटर आहे.

मोबाईलवरून तपासा इंधनाचे ताजे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर मोबाईलवरून सहज तपासता येतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <स्पेस> शहराचा कोड असा एसएमएस 9224992249 या क्रमांकावर पाठवावा. तर भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांनी 9223112222 या क्रमांकावर एसएमएस करून ताजे दर जाणून घेता येतील.

वाहनात इंधन भरण्यापूर्वी आपल्या शहरातील आजचे दर तपासणे फायदेशीर ठरू शकते, कारण तेल कंपन्या दररोज सकाळी नवीन दर जाहीर करतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!