पेट्रोल-डिझेलचे दर बदलले की स्थिर? १२ नोव्हेंबरचे नवे दर जाहीर; महाराष्ट्रातील संपूर्ण यादी एका क्लिकवर


मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूडचा दर सध्या प्रति बॅरल सुमारे ९२ डॉलरच्या आसपास आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी १२ नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना आजही जुन्याच दराने इंधन मिळणार आहे. मात्र, सीएनजीच्या दरांमध्ये काही शहरांमध्ये वाढ, तर काही ठिकाणी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इंधन भरण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर (प्रति लिटर)
अहमदनगर ₹११२.४१, अकोला ₹१११.७८, अमरावती ₹१११.९७, छत्रपती संभाजीनगर ₹११२.०८, भंडारा ₹११२.८१, बीड ₹११२.४५, बुलढाणा ₹११२.६३, चंद्रपूर ₹११२.५८, धुळे ₹११२.१९, गडचिरोली ₹११२.९५, गोंदिया ₹११३.०४, मुंबई ₹१११.२१, हिंगोली ₹११३.१७, जळगाव ₹११२.५७, जालना ₹११३.२१, कोल्हापूर ₹११२.६०, लातूर ₹११२.६१, नागपूर ₹१११.७२, नांदेड ₹११३.१८, नंदुरबार ₹११२.४८, नाशिक ₹११२.२४, धाराशिव ₹११२.४५, पालघर ₹११२.०४, परभणी ₹११३.१६, पुणे ₹१११.९०, रायगड ₹१११.४६, रत्नागिरी ₹११३.१७, सांगली ₹११२.४४, सातारा ₹१११.८८, सिंधुदुर्ग ₹११३.१७, सोलापूर ₹१११.८५, ठाणे ₹१११.३१, वर्धा ₹११२.३८, वाशिम ₹११२.६३ आणि यवतमाळ ₹११३.१७.

महाराष्ट्रातील डिझेलचे दर (प्रति लिटर)
अहमदनगर ₹९९.०६, अकोला ₹९८.४८, अमरावती ₹९८.६४, छत्रपती संभाजीनगर ₹९८.७२, भंडारा ₹९९.४७, बीड ₹९९.११, बुलढाणा ₹९९.२८, चंद्रपूर ₹९९.२६, धुळे ₹९८.८४, गडचिरोली ₹९९.६१, गोंदिया ₹९९.६६, मुंबई ₹९७.८३, हिंगोली ₹९९.८३, जळगाव ₹९९.२०, जालना ₹९९.८७, कोल्हापूर ₹९९.२५, लातूर ₹९९.२१, नागपूर ₹९८.३८, नांदेड ₹९९.८३, नंदुरबार ₹९९.१३, नाशिक ₹९८.८९, धाराशिव ₹९९.११, पालघर ₹९८.६६, परभणी ₹९९.८३, पुणे ₹९८.५५, रायगड ₹९८.११, रत्नागिरी ₹९९.८३, सांगली ₹९९.११, सातारा ₹९८.५३, सिंधुदुर्ग ₹९९.८३, सोलापूर ₹९८.५२, ठाणे ₹९७.९७, वर्धा ₹९९.०५, वाशिम ₹९९.२८ आणि यवतमाळ ₹९९.८३.

महाराष्ट्रातील CNG चे दर (प्रति किलो)
अहमदनगर ₹१०५.३६, अकोला ₹११०.४८, अमरावती ₹११०.७३, छत्रपती संभाजीनगर ₹१०५.३६, भंडारा ₹१०७.४३, बीड ₹१०१.६०, चंद्रपूर ₹१०६, धुळे ₹९३.६५, गडचिरोली ₹१०७.४३, गोंदिया ₹१०७.४३, हिंगोली ₹११०.४८, जळगाव ₹९९.६०, जालना ₹९९.६०, कोल्हापूर ₹९६.९५, लातूर ₹९४, मुंबई ₹८९, नागपूर ₹८८.९०, नांदेड ₹९६, नंदुरबार ₹१०८.०९, नाशिक ₹९८.५०, धाराशिव ₹९४, पालघर ₹८५.७५, परभणी ₹९०.६५, पुणे ₹१००.५०, रायगड ₹९९.५२, रत्नागिरी ₹९४, सांगली ₹१०५.३६, सातारा ₹१०५.३६, सिंधुदुर्ग ₹९१, सोलापूर ₹१०५, ठाणे ₹८५.७५, वर्धा ₹१०६, वाशिम ₹११०.४८ आणि यवतमाळ ₹११०.७३.

दरांमध्ये कुठे वाढ तर कुठे घसरण?

१२ नोव्हेंबरच्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दुसरीकडे, सीएनजीच्या दरांमध्ये शहरानुसार वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. सोलापूरमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो १२ रुपयांची वाढ, तर धाराशिवमध्ये ८.५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याउलट नागपूरमध्ये ६ रुपये आणि कोल्हापूरमध्ये ४.०५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले तरी सीएनजी वापरणाऱ्या वाहनधारकांना शहरानुसार कमी-अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!