Harshwardhan Patil : मोठी बातमी! हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या अधिवेशनाला मारली दांडी, तुतारी झाली फिक्स?

Harshwardhan Patil : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आताच घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे. राज्याचा राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.
अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे, हर्षवर्धन पाटील यांनी दौंडमधील भाजप जिल्हा अधिवेशनाला दांडी मारली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
दौंडमध्ये आज भाजपचं जिल्हा अधिवेशन भरवण्यात आले होते. या अधिवेशनाला मोठ्या संख्येनं स्थानिक पदाधिकारी आणि नेते उपस्थितीत होते. या अधिवेशनासाठी हर्षवर्धन पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं.
पण जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित आहे. पण हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण देऊनही दांडी मारली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण दिल्याचं सांगितले आहे. Harshwardhan Patil
दरम्यान, हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाऊ शकतात, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते आहेत. इंदापूरमधील पेचावर चर्चा करून मार्ग काढू, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील भाजपमधून बाहेर जातात का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.