Harshvardhan Patil : बारामतीची जागा राष्ट्रवादीला हे अजून ठरलेलं नाही! हर्षवर्धन पाटलांचे मोठे वक्तव्य, अजित पवारांचे टेन्शन वाढणार?
Harshvardhan Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच यावर अनेकजण वेगवेगळे प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच देण्याचा मोठा निकाल दिला. पण या निर्णयामुळे माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी दिली.
तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागतेय का? असा प्रश्न विचारल्यावर, हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
तसेच बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही, असं म्हणत पाटलांनी अजित पवारांना डिवचले आहे. Harshvardhan Patil
दरम्यान,अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असे सूचक विधानही हर्षवर्धन पाटलांनी यावेळी केले आहे.