छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत, जाणून घ्या कोणत्या किल्ल्याचा आहे समावेश..

नवी दिल्ली : संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून या किल्ल्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. यामुळे ही एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

यात महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. अभूतपूर्व स्थापत्य हे या सर्व किल्ल्यांचे प्रमुख वैशिष्टय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे किल्ले बांधले आहेत.
या सर्व किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. यामध्ये संभाजीराजे छत्रपती, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने याबाबत लक्ष घातले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले फक्त्त वास्तू नाहीत तर हिंदवी स्वाभिमान आणि शौर्याचे ते साक्षीदार आहेत. अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.

सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ह्ज या पाच स्थळांचा या आधीच समावेश होता.
त्यामध्ये आता वरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. दरम्यान, जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत. ही आपली ओळख आहे.